पत्नीवरील अश्‍लील टीकेमुळे ‘या’ नेत्याने थेट पक्षालाच ठोकला रामराम

लखनौ – समाजवादी पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते अनिल यादव यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अखिलेश यादव यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असलेले अनिल यादव यांनी राजीनामा देत म्हटले की, ‘हा समाजवादी पार्टी नाही ज्याचा मी खरा सैनिक आहे.’ त्यांची पत्नी पंखुडी पाठकही कॉंग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत असल्याने तेही कॉंग्रेस पक्षात येऊ शकतात अशी चर्चा आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना राजीनामा देताना अनिल यादव यांनी काही समाजवादी नेत्यांनी पत्नी आणि कॉंग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी पंखुरी पाठक यांच्याविरोधात अश्‍लिल भाष्य केल्याचा आरोप केला आहे.

ज्यांना पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही, उलट अनिल यादव यांना गप्प राहण्यासाठी दबाव आणला गेला. त्यामुळे अनिल यादव यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात त्यांनी ट्‌विटवर एक व्हिडिओही अपलोड केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.