अनिलचे टॅटूप्रेम

बॉलीवूडचा एव्हरग्रीन सुपरस्टार अनिल कपूरचा “मलंग’ हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारसा चमक दाखवू शकलेला नाही; परंतु त्याच्यासाठी या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत. वयाच्या 63 व्या वर्षांत पदार्पण केलेला अनिल कपूर सध्या हे अपयश विसरून आपले स्टारडम एंजॉय करत आहे.

वाढत्या वयातही तरुणांना लाजवेल असा यंग दिसणाऱ्या अनिल कपूरने अलीकडेच आपल्या शरीरावर टॅटू बनवून घेतला आहे. “मलंग’ चित्रपटासाठी दिग्दर्शक मोहित सुरीने अनिल कपूरच्या लूकबाबत बरेच परीक्षण आणि निरीक्षण केले होते. परंतु टॅटू बनवण्यावरून अनिल कपूर काहीसे अपसेट झाले होते.

कारण त्याला स्वतःला टॅटू अजिबात आवडत नाही. मात्र, या चित्रपटातील अनिल कपूर यांनी साकारलेली व्यक्‍तिरेखा स्वतःच्या लूकबाबत सतत सजग असणारी होती. त्यामुळे अनिलने हा टॅटू बनवला. आता मात्र अनिल सर्वांनाच हा टॅटू दाखवताना दिसतात. विशेषतः त्यांच्या खास व्यक्‍तींना तर ते आवडीने टॅटू दाखवत आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की अनिल कपूर यांच्यासाठी वय हे केवळ एक संख्या आहे. ते आजही तरुणच आहेत. लवकरच ते “तख्त’ या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात शहाजहानची व्यक्‍तिरेखा साकारत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.