भोपाळ – महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा भाजपाचा मध्य प्रदेश येथील मीडिया संपर्क प्रमुख अनिल सौमित्र यांचे भाजपाने निलंबन केले आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणे अनिल सौमित्र यांना महागात पडले आहे. महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र जन्मले काही लायक निघाले काही नालायक अशी पोस्ट अनिल सौमित्र यांनी केली होती. त्याची तातडीने दखल घेऊन अनिल सौमित्र यांना निलंबित करण्यात आले आहे.
नथुराम गोडसे हा देशभक्त होता, दहशतवादी नाही. असे वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञा यांना पक्षाने झापले आहे. एवढंच नाही तर या वक्तव्याबाबत साध्वी प्रज्ञाला कधीच माफ करणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याची दखल घेऊन साध्वी प्रज्ञा यांनाही पक्षाने झापले. ज्यानंतर पक्षाची आणि माझी भूमिका एकच आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. एवढंच नाही तर अनंतकुमार हेगडे, नलीन कटील यांची जी वक्तव्यं समोर आली त्याप्रकरणी त्यातूनही भाजपाने अंग काढून घेतले. या लोकांनी जी मते माडंली त्याची जबाबदारी भाजपा घेणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले.