पेठ : सातगाव पठार ता आंबेगाव भागात महत्त्वाची समजली जाणाऱ्या
पेठ गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनिता कंधारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर अनिलभाऊ गोविंद सणस यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
अशी माहिती निवडणूक अधिकारी एम. जे. चौगुले यांनी दिली. सरपंच सुरेखा पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम.जे.चौघुले यांनी काम पाहिले. या प्रसंगी अनिल सणस यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जहिर करण्यात आले. याप्रसंगी संतोष धुमाळ, रघुनाथ तोडकर, साधना धुमाळ, अनिता कंधारे, रोहिणी रासकर, मालती राऊत हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अनिल भाऊ सणस यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. छायाचित्र -सोबत निवड झालेल्या अनिल सणस यांचा फोटो मेल केला आहे.