विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा लोटला आहे. मात्र, नवं सरकार कोणाचं? या प्रश्न अजून सुटलेला नाही. भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रेटारेटी सुरू असून, युतीचा तोडगा लांबणीवर पडत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांना ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर अनिल कपूर यांनी मजेशीर उत्तर दिलं, “मी नायक आहे आणि हेच माझ्यासाठी चांगलं आहे”. असं कपूर म्हणाले.पुण्यातील एका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला अनिल कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला होता.
२००१ साली नायक चित्रपटात अनिल कपूर यांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री ही भूमिका साकारली होती. त्यांचा हा एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण देशानं बघितला आणि त्याच जोरदार कौतुकही केलं होत.