बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर धम्माल करताना दिसणार आहे. बॉलीवूडमधील राम-लखन अर्थात जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर या जोडीने “राम-लखन’, “परिंदा’, “काला बाजार’, “कर्मा’, “अंदर बाहर’, “युद्ध’, “परिंदा’, “1942 – ए लव स्टोरी’, “त्रिमूर्ती’ आणि “लज्जा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
अनिल कपूर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो समुद्र किनारी धावताना दिसत आहे. यावर जॅकी श्रॉफने एक फायर इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या कमेंटला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाले, आपल्या आगामी चित्रपटासाठी तयार हो… यावर संपूर्ण टीम काम करत आहे.
यावर जॅकीने प्रतिक्रिया देत एक स्क्रीनशॉट शेअर करत होकार दर्शवित थॅम्ब प्रेस केले आहे. त्याने लिहिले की, “माझ्या लखन, मी तुमची आतुरतेने वाट पाहात आहे.’
यानंतर सोशल मीडियावर जॅकी आणि अनिल कपूरच्या “राम लखन’ चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली. तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की, अनिलचा मुलगा हर्षवर्धन कपूरने लखन आणि जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफने राम म्हणून भूमिका साकारली पाहिजे.