बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या वयावर मात करत ते आजही तारुण्यात असल्याचे दाखवून दिले आहे. यात सर्वात आघाडीवर नाव घेता येईल, ते म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूर यांचे वय वर्षे 63 असून, अद्यापही ते एखाद्या युवा कलाकारापेक्षा कमी वाटत नाही. या मागचे कारण म्हणजे अनिल कपूर यांचा आजही असलेला फिटनेस. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपली बॉडी खूपच मेंटेन केली आहे.
अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ते आजही तारुण्यात असल्याचे दिसून येते. यात अनिल कपूर हे बीचवर शर्टलेस मध्ये फिरताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “हे वडील फक्त उपदेशच देत नाही, तर शर्टलेस होत बीचवर फिरतातही.’ वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनिल कपूर हे अखेरच्या वेळी मोहित सूरी यांच्या “मलंग’ चित्रपटात झळकले होते.
यात त्यांच्यासोबत आदित्य रॉय-कपूर, दिशा पटणी आणि कुणाल खेमू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसेच करण जोहरच्या मल्टी स्टार “तख्त’ चित्रपटही त्यांनी साइन केला आहे. यात त्यांच्यासोबत विकी कौशल, रणवीर सिंह, करिना कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर झळकणार आहेत.