‘बदनपे सितारे लपेटे हुये’वर थिरकला अनिल कपूर’

बॉलीवूड मधील दिवंगत गायक मोहंमद रफी यांच्या ३८व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे अजरामर गीत ‘बदन पे सितारे’ या गाण्याचे नवीन वर्जन रीलीज करण्यात आले. या नवीन गाण्यात आपल्याला अनिल कपूर थिरकताना दिसत आहेत. त्याने जुन्या गाण्यातील शम्मी कपूर यांच्या पेहरावाची तंतोतंत कॉपी करत सोनेरी रंगाचा सूट परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय.

हे गाणे अनिल कपूर, ऐश्वर्या राय- बच्चन आणि राजकुमार राव यांच्या आगामी ‘फन्ने खान’ चित्रपटासाठी चित्रित केले गेले आहे. नवीन गाणे सोनू निगम यांनी गायले आहे. जुने गाणे हे १९६९ मध्ये आलेल्या ‘प्रिन्स’ या चित्रपटातील होते. वैजयंतीमाला आणि शम्मी कपूर यांच्यावर हे गाणे चित्रित झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

https://twitter.com/AnilKapoor/status/1024213226551169024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)