क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी अनिल फरांदे

पुणे – कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाईच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी एकमताने पिंपरी चिंचवड येथील बांधकाम व्यवसायिक व फरांदे प्रमोटर्स ऍण्ड बिल्डर्सचे अध्यक्ष अनिल फरांदे यांची निवड करण्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्याकडून फरांदे यांनी सूत्रे स्वीकारली. पुढील दोन वर्षे म्हणजे एप्रिल 2021 ते मार्च 2023 दरम्यान अनिल फरांदे हे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने कळविण्यात आली आहे.

याबरोबरच रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून अरविंद जैन (सचिव), आय. पी. इनामदार (खजिनदार) तर तेजराज पाटील हे मानद सहसचिव म्हणून पुढील दोन वर्षांसाठी काम पाहतील. याशिवाय इतर आणखी 16 सभासद देखील या कार्यकाळात व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.