Anil Deshmukh – माझ्या विरुध्द कारस्थान रचून मला खोट्या आरोपामध्ये १४ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. न्यायालयीन लढाई लढून मी तुरुंगाच्या बाहेर आलो. मी तुरुंगात असतांना माझ्या विरुध्द कसे कारस्थान रचण्यात आले यावर पुस्तक लिहिले.
तुरुंगात असतांना अनेक वृत्तपत्राची कात्रणे व अनेक संदर्भ गोळा केले. तुरुंगातून बाहेर आल्यावर या पुस्तकाला अंतीम स्वरुप दिले असून हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये छापण्यात आले आहे.
लवकरच मी लिहिलेल्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
माझ्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कसा प्रयत्न झाला, मला व माझ्या परिवाराला कसा त्रास देण्यात आला, हे जाणून घेण्याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला आहे. मी तुरुंगात असतांना हे पुस्तक लिहण्यास सुरुवात केली.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करीत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे कसे व कोणाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगीतले.