मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर 14 मार्चला सुनावणी होणार आहे. ते सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली आहे.
मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीद्वारे अटक केल्यानंतर अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बारमधून प्रतिमहिना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देत असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.
याप्रकरणी अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने गतवर्षी 2 नोव्हेंबरला मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.