गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव; दिल्लीकडे रवाना

नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीमुळं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

माजी गृहमंत्री देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आपल्या विरुद्ध सीबीआय चौकशीचा दिलेल्या आदेशाला रद्द करण्यासाठी अपील केलं आहे.  त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत. परमवीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या मागणीच्या आरोपांची सीबीआयद्वारे प्राथमिक चौकशी करण्याचा मागणी केली आहे. सीबीआयला या चौकशीसाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला होता.

देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी परमवीर सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तर ऍड. जयश्री पाटील यांनीही याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.