अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल आयफोन 12 प्रोसाठी फोडला?

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशी अहवातील माहिती देण्यासाठी त्यांच्या वकीलाकडून सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी आयफोन12 प्रो स्वीकारल्याचे तिवारींवरील आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये अनवश्‍यक हस्तक्षेप आणि त्यांच्या वतीने पोलिसांना वसुलीचे आदेश देशमुख देत असल्याची चौकशी सीबीआय करत आहे. त्यांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून सीबीआयने तिवारी यांना अटक केली.

सीबीआयने या प्रकरणात सीबीआयचे वकील आनंद डागा यांना अटक केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या आरोपावरून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवाल गेल्या आठवड्यात फुटला होता. त्यात सिंग यांनी आरोप केलेला कोणताही दखलपात्र गुन्हा केला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तिवारी आणि डागा यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सीबीआयने 31 ऑगस्टला दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, तिवारीने या प्रकरणाच्या तपासासाठी पुण्याला भेट दिली होती. त्यावेळी आयफोन 12 प्रो तिवारी यांना देशमुख यांचे वकील डागा यांनी दिला. त्याद्वारे या कथित चौकशी अहवालाची माहिती पोहोचवण्यात आली. तिवारी यांना डागा यांच्या कडून नियमितपणे लाच देण्यात असल्याचा संशय यात व्यक्त करण्यात आला आहे.

जप्त केलेले मेमो, जबाब, सिलबंद आणि सीलबंद नसलेली कगदपत्रे, आणि कामकाजाची माहिती तिवारी डागा यांना व्हॉटस्‌ ऍपद्वारे देत होते. देशमुख यांची प्राथमिक चौकशी तपास अधिकारी आर. एस. गुंजाळ करत होते. त्यावेळी त्यांना मदत करत असता तिवारी डागा यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने हा संपर्क कायम ठेवत विश्‍वासघाताचा फौजदारी गुन्हा केला, असे एफआयआरमध्ये नमूद केले. स्वत:ला बेकायदा लाभ मिळवण्यासाठी तिवारी यांनी संवेदनशील आणि गोपनीय माहिती अनधिकृत माणसाच्या ताब्यात दिली. त्यातून तपास भरकवटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

देशमुख यांच्या वरील 21 एप्रिलला दाखल झालेला एफआयआर आणि प्राथमिक तपास अहवाल या दोन्ही घटनांशी तिवारीचा संबंध होता, गुंजाळ यांना मदत करता असताना जाणीवपूर्वक देशमुख यांना क्‍लिनचिट देण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.