शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरण
बॅंक गैरव्यवहारप्रकरणी 16 जणांवर दाखल आहे गुन्हा
पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि सुर्याजी जाधव या दोघांचा जामीन विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला.
याप्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बॅंक गैरव्यवहारप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अनिल शिवाजीराव भोसले, सुर्याजी पांडूरंग जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
अनिल भोसले आणि सुर्याजी जाधव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला.