मुथय्या मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी

चेन्नई  -श्रीलंकेचा महान गोलंदाज आणि आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनवर आज अपोलो रुग्णालयात यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली. मुरलीधरनला रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुथय्या मुरलीधरनची काल रात्री अचानक तब्बेत खालावल्याने तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता हृदयात काही ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. यानंतर अपोलो रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी केली.

ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती संबंधित डॉक्‍टरांनी दिली. मुरलीधरनची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते तातडीने पुन्हा सनरायजर्स संघात प्रशिक्षणासाठी सज्ज होणार आहेत.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेण्याचा विश्‍वविक्रम मुरलीधरन यांच्या नावावर आहे. मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात 800 विकेट घेतल्या आहेत. तसेच 350 एकदिवसीय सामन्यात 534, तर 12 टी-20 सामन्यात 13 गडी बाद केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.