नाशिक – राज्यात करोनाने हाहाकार माजवला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरात करोना रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप आहे. नाशिकमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या संतापाला सामोरं जावं लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी (३० एप्रिल) नाशिक दौरा केला. यावेळी भाजपच्या पदाधिकार्यांनी फडणवीस यांच्यासह येथील रुग्णालयांची पाहणी केली. मात्र नेत्यांची गरदी पाहून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही संताप अनावर झाला. फडणवीस नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या पाहणी करत असताना रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना ‘टरबुज्या’ म्हणून हिणवलं. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांना देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी खडे बोल सुनवाले.
दरम्यान नाशिकमध्ये करोनाची स्थिती भीषण आहे. अशा काळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून गर्दी करणे विरोधीपक्षनेत्याला शोभत का, असा सवाल नातेवाईकांनी केला. तुम्ही येथून माघारी जा, अशी नारेबाजी देखील केली. या सर्व प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस हे मुकाट्याने आपल्या वाहनात जावून बसले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.