Mumbai Crime News : शनिवारी रात्री मुंबईतील पश्चिम रेल्वमार्गावरील मालाड स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ३१ वर्षांच्या प्राध्यापकाचा चाकू भोकसून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आणि आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिवारी रात्री मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ येथे ही घटना घडली. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने थरकाप उडवला आहे. आलोक सिंह (वय ३१) असे प्राध्यकाचे नाव असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदे (वय २७) याला अटक केली आहे. हेही वाचा : Shakeel Ahmad : “मी त्यांच्यापेक्षा असुरक्षित नेता कधीच पाहिला नाही” ; राहुल गांधींना काँग्रेसच्याच नेत्याकडून घरचा आहेर मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरुन आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला आणि आलोक सिंह यांच्या पोटात ओंकारने चाकू खुपसला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम केला. वेगाने तपासची चक्रे फिरवत पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी ओंकार शिंदे याला वसई स्थानकातून ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. वादाचे कारण केवळ धक्का लागणे होते की आणखी काही याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे चौकशीतून काय माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोण होते आलोक सिंह? आलोक सिंह हे विलेपार्ले येथील एन.एम (NM) महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचे वय ३१ वर्ष होते. हेही वाचा : Dilip Sopal : “दोन्ही शिवसेना एकत्रित हे मी घडवून आणलं नाही ते…”; जाहीर सभेतून उद्धवसेनेच्या आमदाराचा मोठा खुलासा