किम जोंग उन यांना राग अनावर ; दोघांना दिला मृत्युदंड

प्याँगयाँग : जगात करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना दिसत आहे. त्यातच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे करोनाच्या परिस्थितीमुळे संतापले आहेत. त्यांनी सागरातील मासेमारीला बंदी घालून राजधानी प्याँगयाँग पूर्णपणे बंद केली आहे. करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी त्यांनी संतापाच्या भरात चक्क दोघांना मृत्यूंदड दिला आहे.

किम सरकारने परदेशातील राजनैतिक अधिकाऱ्यांना अमेरिकेला भडकावणारी कुठलीही कृती करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा उत्तर कोरियाबाबत दृष्टिकोन किंवा धोरण काय असेल याचा अंदाज अजून किम यांना आलेला नाही. किम यांनी राष्ट्रीय गुप्तचर सेवेची बैठक घेतली. त्यावेळी उपस्थित असलेल्या हा ते केउंग यांनी सांगितले की, किम जोंग उन हे संतापले असून करोना व त्याचे आर्थिक परिणाम यामुळे त्यांचे वर्तन विचित्र व लहरी झाले आहे.

उत्तर कोरियातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित एकाला व नंतर परदेशातून वस्तू आणण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीला ऑगस्टमध्ये मृत्यूदंड देण्यात आला. सागरात करोना विषाणू जाऊ नये यासाठी किम यांनी मासेमारी व मीठ उत्पादनावर बंदी घातली आहे, चीनलगतची सीमा आधीच बंद केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.