अँजेलिनाने लूक बदलला!

मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी काम करताना बहुदा सर्वच हॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना आपला लूक बदलावा लागतो. हॉलीवूडमधील दिग्गज, प्रतिष्ठित आणि बहुलोकप्रिय कलावंतही यापासून स्वतःचा “बचाव’ करून घेऊ शकलेले नाहीत. आता अँजेलिना जोलीचेच उदाहरण घ्या ना! मार्वेलच्या आगामी “द एटर्नल्स’ या चित्रपटातील सुपरहिरो महिला समूहाची ती सदस्या आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली असून अलीकडेच यातील पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणाचे फोटोही उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये अँजेलिना शुभ्र पांढरा फ्लाईंग गाऊन परिधान करून बोल्ड आणि बिनधास्त लूकमध्ये पाण्यात उतरताना दिसत आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना मनापासून आवडला आहे. आता चित्रपटातील अन्य कलाकारांचे नवे लूक कसे असतील याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.