अँजेलिना आणि ब्रॅड पीट पुन्हा भेटले

गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुमारास एकमेकांपासून विभक्‍त झालेले अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीट पुन्हा एकदा भेटल्याने अचानक चर्चेला सुरुवात झाली आहे. या दोघांमधील कोर्टकचेऱ्याचे प्रकरण सोशल मीडियामधूनही खूप गाजले होते. अँजेलिनाने 2016 साली घटस्फोटासाठी केलेल्या अर्जाबरोबर आपल्या सहाही मुलांचा ताबा आपल्यालाच मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तिला मुलांचा ताबा मिळाला पण मुलांसाठी ब्रॅडने काहीही आर्थिक तरतूद न केल्याने तिने पुन्हा एकदा हॉलीवूडपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

यावर्षीचा उन्हाळ्याचा अख्खा सीझन अँजेलिनाने शूटिंगसाठी खर्च केला. “दोज हू विश मी डेड’ हा तिचा अगामी सिनेमा आहे. याच दरम्यान ती ब्रॅड पीटला भेटली आणि आपल्या मुलांची भेटही तिने घडवून आणली. विभक्‍त झाल्यापासून पहिल्यांदाच ब्रॅड आपल्य मुलांना अगदी थोड्यावेळासाठी भेटू शकला आहे. या दाम्पत्याला 10 ते 17 वर्षाची 6 मुले आहेत.
2004 साली “मिस्टर ऍन्ड मिसेस स्मिथ’च्या शूटिंगच्या निमित्ताने अँजेलिना आणि ब्रॅडची भेट झाली होती. त्यावेळी ब्रॅडचे जेनिफर ऍनिस्टनबरोबर पहिले लग्न झाले होते. त्या दोघांचा विवाह 2005 मध्ये अधिकृतपणे संपुष्टात आला.

अँजेलिनाबरोबरचे ब्रॅडचे अफेअर हेच त्यासाठी कारण ठरले. अँजेलिना आणि ब्रॅडने 10 वर्षांच्या अफेअरनंतर 2014 साली लग्न केले. त्यांच्या विवाहाने त्यांच्या फॅन्सना जेवढा आनंद झाला असेल, त्यापेक्षा त्यांच्या घटस्फोटाने दुःख झाले असेल. हॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या या कपलला पुन्हाएकदा भेटल्याचे बघून अनेकांना आनंद वाटला. मात्र हा आनंद अगदी क्षणिक आहे. कारण ही भेट अनौपचारिक होती. हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्‍यता नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.