नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या संकटकाळात बूथ हॉस्पिटलचे काम स्पृहणीय आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच आहे, असे विचार आमदार संग्राम जगताप यांनी केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बूथ हॉस्पिटलला नगरच्या लुंकड व शेवगावच्या वधवा परिवारातर्फे संगणक संच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भेट देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दिलीप लुंकड, अजय ढोणे, कचरदास लुंकड, पियुष लुंकड, चेतन गोधडे, निखील ढोणे, चरण गिते, प्रवीण कोठारी, राहुल उन्हाळे, बाळासाहेब दहिहंडे, दीपेश लुंकड, सचिन वधवा, मेजर कळकुंबे, डॉ. अभिजीत केकाण आदी यावेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, “”वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अनेक करोना यौद्धे कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. समाजातील अनेकजण त्यांच्या सेवेचा गौरव करीत आहेत. त्यांना मदत करण्याचे काम करत आहेत. येथे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामागे हे देवदूतच आहेत.” दिलीप लुंकड, अजय ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. मेजर कळकुंबे यांनी येथील वैद्यकीय सुविधांची माहिती दिली.