ANGEL TAX । 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला. यावेळी देशातील तरुण,महिला आणि गरिबीवर सरकारने लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसले. त्यासोबतच देशातील कर रचनेला चालना देण्यासाठी सरकारने नवीन योजनांच्या घोषणा देखील केल्या आहेत.
एंजल टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव ANGEL TAX ।
दरम्यान, हा अर्थसंकल्पात देशातील स्टार्टअप इकोसिस्टमसाठी उत्कृष्ट ठरला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एंजल टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, जो स्टार्टअप्सच्या जगासाठी खूप फायदेशीर ठरेल.
गुंतवणूकदारांना एंजल टॅक्समधून सवलत मिळणार ANGEL TAX ।
2024-25 चा पूर्ण अर्थसंकल्प आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले – सर्व गुंतवणूकदार वर्गासाठी एंजल टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ आता प्रत्येक वर्गातील गुंतवणूकदारांना एंजल टॅक्समधून सवलत मिळणार आहे.