अंगणवाड्यांना मिळणार नवीन चेहरा

संग्रहित फोटो

-जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी “फेरोरे’ पुढाकार
– आठ अत्याधुनिक अंगणवाड्या उभारणार
– प्रशस्त अंगणवाड्या, शौचालय आणि मुलांसाठी खेळणीही असणार

पुणे – सीएसआरच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना नवीन चेहरा मिळणार आहे. प्रशस्त अंगणवाड्या, शौचालय आणि मुलांसाठी खेळणी असणार आहे. दरम्यान, “फरेरो रॉचर’ कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात आठ अत्याधुनिक अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत. हे कौतुकास्पद असून, जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी यावेळी केले.

फरेरो इंडिया कंपनीच्या वतीने बारामती तालुक्‍यात पुढील 3 वर्षांत 8 अंगणवाड्या बांधणार आहेत. त्याबाबत पुणे जिल्हा परिषद आणि कंपनीमधील सामंज्यस्य करार नुकताच झाला. यावेळी अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते. कंपनीचे जनरल सेक्रेटरी इंदर चोप्रा, लिंगुवा ओसवाल्डो, रिगोर्डा लुंगा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी भोर उपस्थित होते.

या करारासाठी सदस्य रोहीत पवार यांनी विशेष प्रयत्न केले. कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या अंगणवाड्या या अत्याधुनिक असणार आहेत. त्यामध्ये प्रशस्त अंगणवाडी, शौचालय, वॉटर फिल्टर, मुलांना अत्याधुनिक खेळणी यासह सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. यावेळी देवकाते म्हणाले, जिल्ह्यात अंगणवाड्यांची संख्या अधिक आहे. त्यातील काही अंगणवाड्या नव्याने बांधायचा असून, काहींची दुरुस्ती करायची आहे. परंतु, दरवर्षी राज्य शासनाकडून येणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे फरेरो या सारख्या अन्य कंपन्या, सामाजिक संस्था आणि पुढाकार घेऊन जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा यासह सर्वांगिण विकासासाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्य करावे. सूरज मांढरे म्हणाले, अंगणवाडी केंद्रातील बांधकामांमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नप्रभा पोतदार यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here