अंगणवाडी सेविका होणार ‘स्मार्ट’

सर्व माहिती मोबाइल ऍपमध्ये भरता येणार


जूनपासून सर्व सेविकांना मिळणार स्मार्ट फोन

पुणे – लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नोंदी, स्तनदा माता, गरोदर माता आणि मुलींच्या आरोग्याच्या नोंदी अंगणवाडी सेविकांना ठेवाव्या लागतात. त्याचबरोबर पोषण आहाराचे वाटप यासंह वेगवेगळ्या 11 रजिस्टरमध्ये नोंदी ठेवाव्या लागतात. परंतु आता अंगणवाडी सेविका स्मार्ट होणार असून, या सर्व नोंदी आता मोबाइलमध्ये एका ऍपद्वारे भरता येणार आहेत.

अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्याची सुविधा जूनपासून सुरू होणार आहे. त्याबाबत पुणे विभागातील काही निवडक कर्मचाऱ्यांना भोसरी येथील “सीआयआरटी’ येथे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.

भोसरी येथे 7 मे ते 15 मे दरम्यान हे प्रशिक्षण चालणार आहे. त्यादरम्यान मोबाईलमधील ऍप आणि सीमकार्ड सुरू करण्यात येणार आहेत. या मोबाईलद्वारेच सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल ऑनलाइन भरावा लागणार आहे. परिणामी अंगणवाड्यांचा कामकाज गतीमान होऊन पेपरलेस होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सर्व प्रकारच्या नोंदी घेणारे ऍप व सीमकार्ड मोबाईलमध्ये “ऍक्‍टिव्हेट’ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. यापुढे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिला जाणार असून, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामांचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.