नवी दिल्ली : अभिनेता अजय देवगणच्या सिंघम चित्रपटातील एंट्रीवर त्याचे हजारो चाहते आजपण फिदा आहेत. अजय देवगणची हीच स्टाईल कॉपी करणं एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या स्टाइलच्या नादात तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
स्टंटबाज तरुणावर नोएडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आहे. दोन फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर उभं राहून हा तरुण अभिनेता अजय देवगणच्या स्टाईलमध्ये स्टंटबाजी करत होता. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. यानंतर सेक्टर-113 पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
गाड़ियों व बाइक पर खतरनाक स्टंट करने वाले युवक को थाना सेक्टर-113 नोएडा पुलिस द्वारा गिरफ्तार कर स्टंट में प्रयुक्त वाहनों को सीज किया गया।#UPPolice pic.twitter.com/92yYu33O45
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) May 22, 2022
राजीव पुत्र राजेंद्र असं या तरुणाचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो गौतमबुद्ध नगर इथल्या सोरखा गावात राहतो. पोलिसांची स्टंटबाजी करणाऱ्या तरुणासह वाहनं देखील जप्त केली. यासोबतच आरोपीचा व्हिडीओही ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.
सेक्टर-113 पोलीस स्टेशनचे प्रभारी शरद कांत म्हणाले की, “व्हिडीओच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्याची ओळख राजीव असे असून तो सोरखा गावचा रहिवासी आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन एसयूव्ही आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.”