Australian Open 2021 : ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून मरेची माघार

मेलबर्न – अव्वल टेनिसपटू ऍण्डी मरे ( Andy Murray ) याने ऑस्ट्रेलियन ओपन ( Australian Open 2021 ) टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्‍यक करण्यात आलेला विलगीकरण कालावधी पूर्ण होणे कठीण असल्यामुळे हा निर्णय त्याने सांगितले आहे.

स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी त्याची करोना चाचणी घेतली गेली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट झाले.

विलगीकरणाच्या कालावधीत काही सुट मिळेल का याबाबत ऑस्ट्रेलियाच्या टेनिस संघटनेशी त्याची बोलणी सुरु होती. मात्र, त्याला कोणतीही सुट देण्याचे फेटाळले गेल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा त्याने निर्णय घेतला.

करोनाच्या धोक्‍यामुळे तसेच तेथील विलगीकरण कालावधीच्या जाचक नियमांमुळे जागतिक टेनिस स्टार रॉजर फेडरर याच्यासह अनेक खेळाडूंनी यापूर्वीच माघार घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.