अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकेरीच्या लढतीत भाग घेणार नाही – अँडी मरे

सिनसिनाटी – सिनसिनाटी मास्टर्स पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने ब्रिटनच्या अँडी मरेला पहिल्या फेरीतच पराभवाच स्विकारावा लागला आहे. पुरूष एकेरीच्या सामन्यात रिचर्ड गॅसकेटने अँडी मरेचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. त्यानंतर आगामी अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकेरीच्या लढतीत भाग घेणार नाही, असं अँडी मरे याने सांगितले आहे.

“एकेरीच्या टेनिसमध्ये सध्यातरी माझा खेळ कमी पडत आहे. साहजिकच आगामी अमेरिकन खुल्या स्पर्धेत मी दुहेरीच्या लढतींमध्येच भाग घेणार आहे आणि त्यासाठी योग्य साथीदाराच्या मी शोधात आहे. दुहेरीत चांगले यश मिळविण्यासाठी मी मेहनत करीत आहे”.
– अँडी मरे, माजी ग्रॅंड स्लॅम विजेता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.