बीजिंग: माजी ग्रॅंड स्लॅम विजेत्या अँडी मरेने चीन खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. त्याने कॅमेरून नोरी याचे आव्हान 7-6 (8-6), 6-7 (4-7), 6-1 असे संपुष्टात आणले.
जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित खेळाडू मरेने पासिंग शॉटस व जमिनीलगत व्हॉलीजचा बहारदार खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये त्याला टायब्रेकरमध्ये सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र, हा सेट गमाविल्यानंतर त्याने तिसऱ्या सेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला.
त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पक खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली. मरेने करिअरमध्ये आतापर्यंत तीन वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळविले आहे.