लंडन – तीन वेळचा ग्रॅंडस्लॅम विजेता इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरे पुन्हा व्यावसायीक टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे. सततच्या दुखपतीला त्रासून त्याने मागील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धे दरम्यान निवृत्तीची निर्णय घेतला होता. तो मागील 18 महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता.
टेनिस खेळत असलेला स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केल्याने त्याच्या पुनरागमना विषयीच्या चर्चांना उधान आले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्याच्यावर हिप रीसर्फेसिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुरू असलेल्या चर्चांनुसार तो पुढील काही एटीपी टूर स्पर्धांमध्ये सहभागी होउ शकतो. तर, मानाच्या विम्बल्डन स्पर्धे मध्ये तो पुरुष दुहेरीत खेळण्याची शक्यता आहे.