प्लाझ्मा दान करणाऱ्यांना आंध्र प्रदेश सरकार देणार पाच हजार

हैदराबाद – प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने केली आहे.

राज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर विशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असून सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लड बॅंकांशी संपर्क साधण्यात येत आहे. करोनामधून बरे झालेल्या रूग्णांना आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरमधून कॉल केला जाईल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगितले जाईल. तसेच, त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यासाठी प्रवृत्त करेल.

दरम्यान, आंध्र प्रदेश सरकार सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण करोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी दररोज सुमारे 15 कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील करोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.