मुंबई – नुकतीच ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली. या पार्टीत चित्रपटात काम केलेले सर्व कलाकार दिसले. कियारा अडवाणीही पार्टीत पोहोचली. ती ज्या ड्रेसमध्ये पोहोचली त्या ड्रेसने तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कियाराने वॉटर-ग्रीन कलरचा ब्लेझर घातला होता. यासोबत ती हॉट पँटमध्ये दिसून आली.
कियाराला तिच्या कपड्यांवरून लोकांनी चांगलेच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यात कियारा खूपच हॉट दिसत होती. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.
‘ना विनोद, गाड़ी निकाल मैडम पैंट भूल गई हैं’अशी कमेंट लिहिले आहे तर एकाने लिहिले की,’दीदी पॅन्ट कुठे विसरली.’ असं म्हणत कियाराला तिच्या ड्रेसिंग स्टाईलवरून चांगलेच ट्रोल केले आहे. कियाराचे चित्रपट एकापाठोपाठ एक यश मिळवत आहेत. गेल्या वर्षी शेरशाह हिट ठरला, या वर्षी भूल भुलैया 2 आणि आता जुग जुग जिओने कमाल केली.