..आणि उर्वशी रौतेला भडकली

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून या स्टोरी मधून ति खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर चांगलीच भडकली आहे. भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि उर्वशीच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या वर्षी रंगल्या होत्या. आता काही प्रसारमाध्यमांनी टाकलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी एक्‍स बॉयफ्रेंडकडून पैसे मागत असल्याचे म्हटले आहे. उर्वशीने अशा बातम्या पसरवणाऱ्यावर इन्स्टाग्राम स्टोरीतून राग व्यक्त केला आहे.

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर हार्दिक आणि तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर हार्दिक पांड्याकडून उर्वशी पैसे मागत असल्याचा दावा केला आहे. त्या फोटोखाली उर्वशीने आपला संताप व्यक्त केला आहे.

“मी प्रसारमाध्यम आणि विविध यूट्युब चॅनेल यांना विनंती करते की, अशा पद्धतीच्या स्टोरी अपलोड करू नका, माझेही कुटुंब आहे. मला माझ्या कुटुंबाला उत्तर द्यावे लागते. गेल्यावर्षी एका पार्टीदरम्यान उर्वशी आणि हार्दिक पांड्याची भेट झाली होती.

या भेटीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. प्रसारमाध्यमांत दोघांच्या अफेअरच्या चर्चाही सुरू होत्या. याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या “सिक्रेट डेटिंग’च्या चर्चांनी जोर धरला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.