….अन् सचिन पिळगावकरांचे अश्रू अनावर

मुंबई – कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘दोन स्पेशल’ मध्ये नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि हरहुन्नरी गायक अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली होती. यावेळी जितेंद्र जोशी यांनी त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. या गप्पागोष्टींसोबत सचिन पिळगांवकर यांनी कधी न सांगितलेले किस्से आणि आठवणी मंचावर सांगितल्या.

यावेळी या दोघांमध्ये प्रश्नउत्तरांचा गेम देखील रंगला होता. यामध्ये त्यांना गाणी ओळखायची होती तर दुसर्‍या गेममध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची हो-की नाही मध्ये उत्तर द्यायची होती.. भाजीमार्केट मध्ये बार्गेनिंग केले आहे का ? यावर दोघांनी हो असे उत्तर दिले. तसेच, बायकोसाठी कधी गजरा घेऊन गेला आहात का? हा प्रश्नांचा हा गेम सुरू राहिला… दरम्यान सचिन पिळगावकरांना जेंव्हा त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.