बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आगामी ‘सांड कि आंख’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. प्रमोशनसाठी ती मीडिया इव्हेंटपासून ते मुलाखतीपर्यंत सर्वकाही करत आहे. परंतु, याचदरम्यान तापसी एका महिला पत्रकाराच्या प्रश्नावर चांगलीच भडकली.
माहितीनुसार, तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर सांड कि आंख चित्रपटाचे प्रमोशन करत होती. यावेळी एका मुलाखतीत तापसीला #मीटू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. एका महिला पत्रकाराने विचारले कि, मीटू मोहिमेनंतर बॉलिवूडमध्ये काही बदल झाला आहे का? ही मोहीम सध्या जवळपास संपुष्टात आली आहे. या मोहिमेला सुरू ठेवण्याची गरज आहे का? या प्रश्नावर तापसी महिला पत्रकारावर भडकली आणि काय विचारायचे आणि काय नाही याबाबत सल्ला दिला. सोबतच या प्रश्नाला कमकुवत म्हणत तापसीने त्या पत्रकाराची खिल्ली उडवली. तर मीटूच्या प्रश्नावर तापसीची सहकलाकार भूमी पेडणेकरने अतिशय शांतपणे मत मांडले.
View this post on Instagram
1 more hour before the celebration song drops in! #Womaniya #SaandKiAankh
दरम्यान, ‘सांड की आंख’शिवाय ‘रश्मी रॉकेट’ आणि “थप्पड’ यासारखे सिनेमेही तापसीकडे आहेत. तिच्या अन्य सिनेमांपेक्षा “गेम ओव्हर’ला कमी प्रसिद्धी मिळाली होती. “नाम शबाना’मध्ये फाईटर असलेली तापसी “गेम ओव्हर’मध्ये गुंडांसमोर असहाय्य झालेले बघवत नव्हते. पण अशाप्रकारे वेगळे रोल निवडण्याचीच तिची ईच्छा आहे.