मुंबई – आपल्या आवडीच्या स्टारसाठी फॅन्स कधी काय करतील याचा नेम नाही. आजवर तुम्ही सेल्फीसाठी स्टार्सच्या गाडीमागे पळणारा चाहता पाहिला असेल किंवा स्टारला गिफ्ट देणारा चाहत्याबाबत देखील ऐकले असेल परंतु बॉलिवूड स्टारच्या थेट घरात घुसणाऱ्या चाहत्यांबाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? हा चाहता थेट शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात घुसला होता. स्वतः शाहरुखने या चाहत्यांचा किस्सा शेअर केल्यानंतर ही घटना समोर आली.
शाहरुखचा मन्नत हा बंगला चाहत्यांना अतिशय प्रिय आहे. शाहरुखच्या जन्म दिवसावेळी याठिकाणी अनेक चाहते जमा झालेले तुम्ही पाहिले असतील. परंतु एका पट्ठ्याने थेट शाहरुखच्या घरात घुसण्याची डेरिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कार्यक्रमात शाहरुखने याबाबत खुलासा केला. शाहरुखने सांगितले,एकदा त्याच्या घरी मोठा प्रोग्रॅम होता त्यासाठी अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शाहरुख पत्रकारांशी संवाद साधणार असल्यामुळे जर्नलिस्ट देखील उपस्थित होते. याच वेळेस एक चाहता नकळत शाहरुखच्या घरात घुसल्याच शाहरुख सांगतो.
सगळा प्रोग्रॅम सुरु असताना हा चाहता मात्र घराबाहेर स्विमिंगपूलमध्ये अंघोळ करत होता आणि याचवेळी त्याची पोलखोल झाली. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून तू इथं काय करतोय असं विचारलं असता तो म्हणाला मी फक्त इथं अंघोळ करायला आलो होतो कारण मला शाहरुखने केलेल्या पाण्यात आंघोळ करायची होती. ज्यावेळी शाहरुखला हा प्रकार समजतो त्यावेळी तो चाहत्याकडे येतो त्यावर चाहता म्हणतो जास्त क्लोज येऊ नका माझी अंघोळ झाली आहे आता मी जातो. शाहरुख म्हणतो हा किस्सा माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.