…अन्‌ सर्वपक्षीय आले एकत्र!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील प्रमुख दिग्गजांबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रविवारी (दि.27) गप्पांची मैफल रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळ उपक्रमाचे.

पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन येथे दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रामचंद्र देखणे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, संजय काटे आदी उपस्थित होते.

या उपक्रमात सर्वांनीच दिवाळी फराळाचा आनंद घेत दिलखुलास संवाद साधला. दोन तास गप्पांची मैफल रंगली. कोपरखळ्यांमधून अनेकदा हास्याचे कारंजे फुलले. डॉ. कोत्तापल्ले आणि डॉ. देखणे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. तर सचिन साठे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.