‘…आणि तुमच्या ‘त्या’ भागावरचे डांबर काढून तुमच्याच तोंडावर फासा’, अश्लील कमेंटवर शशांक भडकला

पुणे – सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका “शशांक केतकर’ने आपली एक स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे.

शशांक सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असून, तो नेहमीच समाजातील चालू घडामोळींवर आपले मत व्यक्त करत असतो. त्यामुळे शशांक बऱ्याचदा नेटकऱ्यांचा शिकार सुद्धा होतो. मात्र, पुन्हा एकदा शशांक चर्चेत आला आहे. शशांक सध्या झी मराठी वाहिनीवरील “पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. तर हा बदल त्यानेही स्वीकारला आहे. पण एक अश्लिल भाषेतील कमेंट त्याच्या फेसबुक पोस्ट वर एका युझर ने केली होती. आणि त्यानंतर शशांक चांगलाच संतापला आहे. शशांकने या युझरच्या कमेंटला रिप्ले देत चांगलाच टोला ,मारला आहे. तसेच त्याने एक भली मोठी पोस्ट लिहत आपले मत मांडले आहे. 

“मी काय म्हणतो, तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल ,तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अभिनय सुरु करा, आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघण्याची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. ही मालिका आहे…. अजून खूप गोष्ट बाकी आहे… ” या आशयाची पोस्ट शशांकने लिहली आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.