बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या मादक सौंदर्यासह अभिनयामुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सोशल मीडियावर तिची खूप मोठी फॉलोईंग लाईन आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले फोटो आणि जुन्या आठवणी चाहत्यांशी शेअर करत असते. अशीच आपली एक कटू आठवण सांगताना ती भावुक झाली होती.
याबाबत सनीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. सनी म्हणाली, तिला बुलिइंग अर्थात टोकाचा छळ, डिवचणं, हेटाळणी यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे शाळेत असताना असे प्रकार घडले. सनीसोबत शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींनीच तिच्यासोबत हे सगळे केले. तिच्यात शब्दात सांगायचं तर, मी एक गोऱ्या कातडीची भारतीय मुलगी होते. माझ्या त्वचेवर काळी लव होती. शिवाय मी कपडेसुद्धा अगदी व्यवस्थित, फॅशनेबल असे घालत नव्हते.
यामुळे माझ्यासोबत बुलिइंग व्हायची. यात कुठली गंमत किंवा मजेचा भाव अजिबातच नसायचा. या सगळ्या अनुभवांचा माझ्यावर आयुष्यभर प्रभाव राहिला आणि हे काही हवंहवंसं फिलिंग अजिबातच नव्हतं. अनेकदा आपला छळ झाला, की आपण एका चक्रात अडकतो. मग सोबत असणाऱ्यालाही तशीच वागणूक देत हे चक्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आपण समंजस, परिपक्व बनत हे चक्र भेदण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण एका चांगला, निरोगी समाज निर्माण करू शकू, असे तिने सांगितले.