बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिल्पा धनुष्यबाण घेवून निशाणा साधताना सराव करताना दिसून येते.
शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मुलांची बुद्धी आणि शरीर हे ओल्या मातीसारखे असते. यामुळे मला असे वाटते की, आपण आपल्या मुलांना अधिकाधिक खेळ खेळून द्यावेत.
ही बाब स्पोर्टसमॅन स्पिरिट, चांगल्या प्रतिस्पर्धकाची भावना, समृद्ध शरीर आणि भूक वाढविण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच त्यांना जेव्हा एखादा खेळ आवडू लागतो आणि ते अन्य खेळांसोबत ते खेळू लागतात तेव्हा त्यांच्यातील बुद्धीच्या वाढीला चालना मिळते.
शिल्पा शेट्टी म्हणते, मुले तेव्हाच चांगले शिकतात, जेव्हा ते आपल्याला काही करत असताना पाहतात. जे आपण त्यांना करायला सांगतो. यासाठी लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद होते, तेव्हा मी एक नवीन खेळ तिरंदाजी शिकण्याचा निर्णय घेतला, असे ती सांगते.