…अन् संजू बाबाने दिला अ‍ॅक्शन सीन्सला नकार

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या लंग कॅन्सरची झुंज देत आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तो आपली पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला होता. दुबईत आपल्या कुटुंबीयांना काही काळ घालविल्यानंतर तो नुकताच मुंबईला परतला आहे.

 

View this post on Instagram

 

Gearing up for #Adheera!⚔️ #KGFChapter2

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on


संजय दत्तवर दोन कीमोथेरेपी करण्यात आल्या आहेत आणि आता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर तिसरी कीमोथेरेपी करण्यात आले. परंतु, सध्याच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजेच, सर्वांचा लाडका संजू बाबा कॅन्सरमुक्त झाला आहे.

मात्र संजय दत्तचा येणार सिनेमा पृथ्वीराज आणि KFG2मध्ये बदल करण्यात येणार आहेत. आधी या दोनही सिनेमात दमदार अ‍ॅक्शन सीन्स होते. ते  सीन्स करण्यासाठी तो फिजिकली फिट असण्याची आवश्यकता होती. मात्र आता असे नाही आहे, त्यामुळे सिनेमात काही आवश्यक बदल करण्यात येतील.

KFG2 शिवाय संजय अक्षय कुमारसोबत पृथ्वीराजमध्ये सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात त्याला घोडेस्वारीपासून तलवारबाजीपर्यंत बरेच काही करायचे आहे.पण आता त्याची प्रकृती पाहता चित्रपटात काही बदल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत संजय दत्त मोठ्या पडद्यावर आपली भूमिका साकारताना दिसणार आहे, पण कदाचित तो अ‍ॅक्शन सीन्स करणार नाही.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्त अनेक चित्रपटांत झळकणार आहेत. यात शमशेरा, केजीएफ चॅप्टर-2, पृथ्वीराज, भुज ः द प्राइड ऑफ इंडिया आणि तोरबाज आदी चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत, तर काही चित्रपटाचे थोडेफार काम बाकी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.