अन्‌ रोहित पवारांनी केली सलूनमध्ये शेव्हिंग!

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जामखेड  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेडमधून आगामी विधानसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदारसंघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच जामखेड दौऱ्यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट शेव्हिंग केली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

विधानसभा निवडणूक ही दोन अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षासह इच्छुक उमेदवारांनी त्या-त्या मतदारसंघात संपर्कला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार रोहित पवार व बारामती अग्रोच्या विश्‍वस्त सुनंदाताई पवार या दोघांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीवर डोळा ठेवून संपर्कात वाढ केली असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.

रोहित पवार जामखेड येथील हजरत इमाम शहा वली दर्ग्या येथे दर्शनासाठी गेलो होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर येत असताना समोरील संदीप मेन्स पार्लरचे मालक संदीप राऊत यांनी रोहित पवारांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रोहित यांनी त्याच्या सलूनमध्ये जाऊन थेट शेव्हिंग करुन घेतली. रोहित पवार यांचे सलूनमध्ये कटींग करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. रोहित पवार यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट देखील टाकलीय. प्रेमाचा फोटो अन्‌ हक्काची भेट!’ असा शीर्षक पवार यांनी सदर फोटोला दिलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.