…अन्‌ पुण्याच्या मदतीला रायगड धावतोय

शहराच्या गरजेच्या 35 टक्के ऑक्सिजन पुरवठा सुरू

पुणे- पुणे जिल्ह्याची ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी आता रायगड जिल्ह्यातून दररोज 30 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. तो पुणे जिल्ह्याच्या एकूण मागणीच्या 35 टक्के आहे.

पुण्यासह विभागातील अन्य जिल्ह्यांतदेखील एकाच वेळी ऑगस्टमध्ये करोना विषाणूचा उद्रेक झाला. यामुळेच ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली. यामुळेच मागणी आणि पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात असमतोल निर्माण झाला.

याचा थेट परिणाम करोना रुग्णांवर होऊ लागल्याने प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. शासनाने यापुढे एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून जास्तीत जास्त पुरवठा मेडिकलसाठी करण्यात येत आहे.

नवीन 700 बेड्स वाढले

गेल्या काही दिवसांतील करोना रुग्णांची वाढती संख्या व भविष्यातील वाढ लक्षात घेऊन खासगी हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त बेड्स संख्या वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नव्याने 700 कोविड बेड्स उपलब्ध झाल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.