अभिनय क्षेत्रातले महत्त्वाचे अवॉर्ड मिळवण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असतं. असंच स्वप्न आहे अभिनेत्री नोरा फतेहीचं जे कोरिओग्राफर रेमो डिसूझामुळे पूर्ण होऊ शकलेले नाही.
View this post on Instagram
Fierce ? #SD3 #StreetDancer3D @marcepedrozo @jerrydsouza6486 @suzan1304 ? @anups_
फार कमी काळात आपल्या डान्सिंग स्कीलमुळे बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण सध्या तिचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एका अवॉर्डसाठी नोरा आणि रेमो डिसूझामध्ये झटापट झालेली पाहायला मिळत आहे.
नोरा फतेही आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नोरा आणि रेमो एकाच अवॉर्डसाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
नोरा फतेही अवॉर्ड ट्रॉफी हातात घेऊन स्पीच देताना दिसत आहे. नोरा फतेहीचं हे स्पीच सुरू असतानाच रेमो डिसोझा त्याठिकाणी येतो आणि तिच्या हातातली ट्रॉफी खेचून घेतो. हे पाहिल्यावर नोराला रडू कोसळले आणि ती नो कॅमेरा प्लिज असे म्हणत मीडियापासून दूर जाताना दिसत आहे.
दरम्यान, नोराच्या बॉलीवूड करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तिने आतापर्यंत “दिलबर’, “कमरिया’ आणि “साकी साकी’ हे आयटम सॉंग केले आहेत. याशिवाय ती अहमद खानच्या “बागी 3′ मध्येही स्पेशल आयटम सॉंग करताना दिसणार आहे.