पुणे – लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेक जणांसाठी देवदूत ठरला होता. तेव्हापासून त्याने मदतीसाठी आपला हात पुढे केला तो अजूनही अनेकांना मदत करतोच आहे. कठिण प्रसंगात गरजूंसाठी धावून आलेल्या सोनू सूदचे सोशल मीडियावरही खूप कौतुक झाले. पण आता त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
त्याचे झाले असे की, “महाशिवरात्री’च्या निमित्ताने सोनू सूदने एक ट्वीट केले. पण हे ट्वीट पाहिल्यानंतर सोनूवर नेटिझन्स भडकले आहेत. ट्विटरवर सोनू सूदला चांगलंच ट्रोल करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी फक्त भगवान शंकराचे फोटो फॉरवर्ड करून नाही तर एखाद्याची मदत करून ही महाशिवरात्री साजरी करा.ओम नमः शिवाय.’ असे ट्वीट सोनू सूदने केले. खूप लोकांनी त्याच्या या ट्वीटवर कमेंट्स करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
ओम् नम: शिवाय 🙏 pic.twitter.com/ZK4dDM6OMN
— sonu sood (@SonuSood) March 11, 2021
दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत ट्वीट केले. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव शाश्वत आहेत, शिव भगवंत आहेत! शिव ओंकार आहेत, शिव ब्रह्म आहेत, शिव शक्ती आहेत, शिव भक्ती आहेत !! लोककलांचा पवित्र उत्सव, महाशिवरात्रीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा! भगवान शिवचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील.’