साउथ सुपरस्टार महेश बाबूने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त सर्व सेलिब्रिटीने महेश बाबूला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. यंदा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरी करण्याचा त्याने निर्णय घेतला होता.
करोना महामारीमुळे त्याने चाहत्यांना सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्याने घरी वृक्षारोपण करत कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. परंतु चाहत्यांनही हा दिवस संस्मरणीय होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. महेश बाबूच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याचा हा वाढदिवस संस्मरणीय बनवून जागतिक विक्रम रचला आहे.
इतकेच नाही तर महेश बाबूंच्या वाढदिवसाच्या या ट्रेंडने सर्व विद्यमान रेकॉर्ड तोडले असून जागतिक विक्रम स्थापन केला आहे. महेश बाबूच्या चाहत्यांनी स्टाईलमध्ये सर्व विक्रत मोडित काढले आणि 60.2 मिलियनहून अधिक ट्विट करत एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. ट्विटरवर हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेंड ठरला आहे. या ट्रेंडमध्ये 1.28 लाखाहून अधिक लोकांनी भाग घेतला, जो स्वतः एक नवीन विक्रम आहे.