…अन्‌ ज्यो बायडेन दहशतवादी अवतारात ; सोशल मीडियावर हाय होर्डिंग्सची जोरदार चर्चा

पेनसिल्व्हेनिया – अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी परतण्याच्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणवर ताबा मिळविला. यामुळे मध्य आशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना दोषी ठरविले जात आहे. विशेष म्हणजे आता अमेरिकेमधूनही या निर्णयाला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकन सैन्याला अफगाणिस्तानमधून पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय ज्यो बायडन यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी ऑगस्ट महिना संपण्याआधीच अमलात आणला गेला. या घोषणेनंतर तालिबानची ताकद वाढली आणि त्यांनी संपूर्ण अफगाण ताब्यात घेतला. यावरूनच बायडेन हे टीकेचे धनी ठरत असतानाच आता अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी बायडेन यांच्यावर याच निर्णयावरून टीका करणारे मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

या होर्डिंगवर बायडेन यांना तालिबानी दहशतवाद्याच्या रूपात दाखवण्यात आले असून त्यासोबत “मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
“द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार पेनसिल्व्हेनियाचे माजी सीनेटर स्कॉट वैगनर यांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात हे कॅम्पेन सुरू केले आहे. बायडेन यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगासमोर अमेरिकेला शर्मेने मान खाली घालावी लागल्याचा आरोप वैगनर यांनी केला आहे.

अमेरिकेवर जगभरामधून बायडेन यांच्या निर्णयामुळे छी थू केली जात आहे, असे सांगतानाच पुढील दोन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बायडेन यांचे असे होर्डिंग लावले जाणार असल्याचेही वैगनर यांनी स्पष्ट केले. या होर्डिंगवर बायडेन यांना तालिबानी वेशात दाखवण्यात आले आहे. बायडेन यांच्या हातामध्ये रॉकेट लॉन्चरही दाखवण्यात आला आहे. स्कॉट वैगनर यांनी या फोटोच्या माध्यमातून बायडेन यांनी अमेरिकन लष्कराला परत बोलावून तालिबानला मदत केल्याचा टोला लगावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.