बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपल्या लुक आणि फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिचा “रूही’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूर खूपच व्यस्त आहे. या बिझी लाईफची एक झलक जान्हवीने सोशल मीडियावर दाखविली आहे.
View this post on Instagram
जान्हवी कपूरने आपले काही फोटो शेअर करत तिने आपला “रिलॅक्स डे’ कसा असतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या दोन फोटोमध्ये जान्हवी ही स्ट्रेपलस टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये पोझ देताना दिसत आहे.
View this post on Instagram
यानंतर अन्य फोटोमध्ये ती कारमध्येच ड्रेस चेंज करत जीन्स घालताना दिसते. कारण तिला थेट विमानतळावर जावून फ्लाइट पकडायची होती. यानंतर चौथ्या फोटोमध्ये जान्हवी रिलॅक्स होत फ्लाइटमध्ये निवांत बसलेली दिसते.
View this post on Instagram
या फोटोंसह जान्हवीने मजेदार कॅप्शनही लिहिले आह. जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, हा एक रिलॅक्स्ड डे होता. या कॅप्शनसह तिने अपसाइड डाउन स्माइलिंग स्माइलीजही पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वरुण शर्मा, जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर “रूही’मध्ये झळकली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपटत असून यात जान्हवीने डबल रोल साकारला आहे.
View this post on Instagram