मुंबई – अभिनेता ह्रितिक रोशन आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जातो. पिळदार शरीरयष्टी आणि चार्मिंग लूक असल्यामुळे त्याला मानणारा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे ह्रितिकला पब्लिसिटीसाठी नको ते स्टंट करण्याची गरज कधीच पडत नाही. असाच एक किस्सा नुकताच समोर आला आहे. एका कार्यक्रमात ह्रितिक चक्क आपल्या फॅनच्या पाया पडल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
झालं असं की ह्रितिक रोशनने एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.त्यावेळी एक चाहता थेट धावत स्टेजवर आला आणि त्याने ह्रितिकचे पाय पकडले आणि लोटांगण घालत तो थेट आपल्या आवडत्या स्टारच्या पाया पडला. हे पाहून ह्रितिकही शांत बसला नाही त्यानेही त्याच चाहत्यांच्या पायाला स्पर्श करत वाकून नमस्कार केला. हे पाहून कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
View this post on Instagram
ह्रितिकच्या या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. काहींनी याला रिस्पेक्ट म्हंटल तर काहींनी याला बॉयकॉटची भीती. ह्रितिक कित्येक महिने मोठ्या पडद्यापासून दूर होता. ‘विक्रम वेधा’मधून तो मोठ्या पडद्यावर लवकरच झळकणार आहे.