बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनला करोना झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याच्यासह मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री हीना खाननेही आपली टेस्ट करून घेतली होती. त्या टेस्टचा रिझल्ट चाहत्यांना सांगण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून लाइव्ह व्हिडिओ प्रसारित केला.
आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती तिने या व्हिडिओतून दिली. कार्तिक आर्यन आणि त्याची “भुलभुलैया-2’मधील सहकलाकार कियारा अडवाणी हे दोघे मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते. तसेच अभिनेत्री हीना खानही तिथे उपस्थित होती.
त्यामुळे कार्तिक आर्यनची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी समजताच हिनानेही आपली करोना टेस्ट करून घेतली. ती टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना दिली.
या व्हिडिओमध्ये हीना म्हणाली, तुम्हाला माझ्या कोविड टेस्टची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. लॅक्मे फॅशन वीकनंतर मी ही टेस्ट केली होती. तुम्ही सगळे जण काळजी करत होतात, हे मला आलेल्या मेसेजेसवरून कळले.
मी मालदीवला जाण्याआधी, तसेच जाऊन आल्यानंतर आणि कार्तिक आर्यनबद्दल कळल्यानंतर करोना टेस्ट करून घेतली. कारण आम्ही सगळे एकत्रच होतो. त्यामुळे मला काळजी वाटत होती. मी तातडीने स्वतःला वेगळे केले आणि माझ्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
मी अगदी ठणठणीत आहे. तब्येत बरी असली, तरी सावधगिरीचा उपाय म्हणून आणखी दोन दिवस विलगीकरणातच राहणार असल्याचेही हीनाने स्पष्ट केले.