नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. व्हाईटहाऊस मधून त्यांच्या निवडीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यात त्यांचा अहमदाबाद दौराही ठेवण्यात आला आहे.
To celebrate Trump’s visit to India I wanted to make a video to show how in my warped mind it will go……
USA and India united! pic.twitter.com/uuPWNRZjk4
— Sol ? (@Solmemes1) February 22, 2020
ट्रम्प भारतातील त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी ट्रम्प यांनी स्वत: एक मजेशीर व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये दक्षिण अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचे मिम तयार करण्यात आले आहे. यात ट्रम्प स्वत: बाहुबलीच्या भुमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्यासोबत त्यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई कुशनर हे देखील दर्शविले आहेत.